ओरिफ्लेमने ऑप्टिमल्स उत्पादनांची नवी श्रेणी सादर केली


ऑप्टिमल एक्स्फॉलिएटिंग फेस स्क्रब देते त्वचेला नवी तकाकी ~


मुंबई, २४ मे २०२२: अग्रगण्य स्वीडिश ब्युटी ब्रॅण्ड ऑरिफ्लेमने ऑप्टिमल्स उत्पादनांची नवीन श्रेणी बाजारात दाखल केली आहे. विशिष्ट प्रकारच्या त्वचेच्या गरजांबरहुकुम खास तयार करण्यात आलेल्या ऑप्टिमल श्रेणीमध्ये स्वीडनमधील स्थानिक नैसर्गिक वनस्पतींमधील त्वचेसाठी गुणकारी पोषकतत्वांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.


या श्रेणीमध्ये ब्रॅण्डने ऑप्टिमल एक्स्फॉलिएटिंग फेस स्क्रब हे उत्पादन दाखल केले आहे. हे वापरायला अतिशय सोपे आणि सर्व प्रकारच्या त्वचेला अनेक प्रकारचे फायदे मिळून देणारे एक्स्फॉलिएटर आहे. स्वीडनमधील स्थानिक वनस्पतींमधून त्वचेसाठी पोषक तत्वे मिळवून तयार करण्यात आलेल्या या स्क्रबमध्ये रोवान बेरीज, सफरचंदांमधील फ्रुट अॅसिड्स, लॅक्टिक अॅसिड आणि नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळविलेले बदामांच्या सालांचे ग्रॅन्युअल्स यांच्यातील अँटिऑक्सिडंट्सचे गुण ओतप्रोत भरले आहेत.


क जीवनसत्वाची रेलचेल असलेल्या रोवान बेरीज त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकण्यास, अर्थात तिला एक्स्फॉलिएट करण्यास मदत करतात, त्वचेवरील रंध्रे कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक कांती बहाल करतानाच तिचा पोतही अधिक एकसारखा करतात. सफरचंदांमधील फ्रुट अॅसिड्स त्वचेला नव्याने तरुण बनवितात व अप्रतिम मुलायमपणा मिळवून देतात व लॅक्टिक अॅसिड पेशींना नवसंजीवनी देणा-या आपल्या असाधारण गुणधर्माच्या आधारे त्वचेचा रंग एकसंध बनविते आणि डाग नाहीसे करते. अखेरचा घटक म्हणजे नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळविलेल्या बदामाच्या सालांचे ग्रॅन्युअल्स त्वचेवरील धूळ, तेल आणि मेकअप, मृत पेशी यांना प्रत्यक्षात दूर करून आतली मऊ, मुलायम आणि निरोगी दिसणारी त्वचा बाहेर आणतात.


ऑरिफ्लेमचे प्रवक्ता म्हणाले, “त्वचेच्या देखभालीच्या एका परिपूर्ण पद्धतीमध्ये दर आठवड्याला केलेले स्क्रबिंग अत्यावश्यक असते हे आता सर्वांनाच माहीत आहे. मात्र स्क्रबच्या कठोर फॉर्म्युलेशन्समुळे अनेक जण ती वापरायला पहात नाहीत, ज्याच्या परिणामी त्वचे स्वास्थ्य डळमळीत होते. ऑप्टिमल्स एक्स्फॉलिएटिंग फेस स्क्रबद्वारे त्वचेची खोलवर स्वच्छता करणारे व तिला एक्स्फॉलिएट करणारे व त्याचवेळी त्वचेवर प्रेम करणा-या घटकांपासून बनविलेले एक उंची, मऊ मुलायम फॉर्म्युलेशन सादर करत आम्ही या सर्व शंकाचे समाधान शोधले आहे. या नव्या एक्स्फॉलिएटिंग स्क्रबमुळे तुम्ही त्वचेच्या स्वच्छतेच्या रूटीनमधून स्क्रबिंगची पायरी पुन्हा कधीही वगळणार नाही.“

Post a Comment

0 Comments