कल्याण पूर्वत कचरा सकंलनाचा बोजवारा जागो जागी कचऱ्याचे साम्राज्य

■सिंगल युज प्लस्टिक पिशव्या बंदीच्या कारवाईचा उडाला फज्जाकल्याण  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने मोठ्या गाजावाजा करून पालिका जाहिरात सुरू केलेली  शून्य कचरा मोहीमेचा चांगलाच फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.  कल्याण पूर्वेतीतील बहुतांश भागातील कचरा उठावाच्या कामातील अनियमित पणा व कचरा सकंलन घंटागाड्या  वळेत येत नसल्याने गल्ली बोळातील कचरा कुंड्या कचर्याने तुडुंब भरल्या असून रस्त्याच्या कडेला  कचऱ्याची ढिगच्या ढिग साचलेले दिसून येत आहेत. महत्वाचे म्हणजे या कचर्यात व नालेसफाईच्या गाळा मध्ये प्लस्टिकच्या पिशव्याचा भरणा असल्याचे दिसून येत आहेत. शहरात जागी जागी साचलेला कचरा नागरिकाच्या आरोग्याला धोकादायक बनला आहे.    कल्याणा डोंबिवली मनपा तील तत्कालीन घनकचरा विभागाचे प्रभारी उपायुक्त रामदास कोकरे यांनी शहरातील साचणारा कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ओला सुका कचरा वर्गीकरण करून शहर कचरा कुंड्या मुक्त करण्यासाठी शून्य कचरा मोहीम पालिका क्षेत्रात राबविली होती या मोहिमेला नागरिकांनी ही उत्फुर्त प्रतिसाद दिला होता. खाजगी ठेकेदाराला कचरा उचण्याच्या  ठेका देण्यात आला असून काही प्रभागातील कचरा उचण्याचे काम खाजगी ठेकेदाराकडून केले जात आहे. कचरा उचण्याचा अनियमित पणा तसेच शहरातील सोसायट्या व चाळी वस्ती मध्ये कचरा  घंटा गाड्या मार्फत कचरा  जमा केला जातो. मात्र कचरा उचण्यासाठी येणाऱ्या घंटा गाड्या दिलेल्या ठराविक वेळेतच येत नसल्याने जमलेला कचरा नागरिक कचरा कुंड्यात तसेच रस्त्याच्या कडेला फेकत असल्याने पालिकेच्या शून्य कचरा महिमेला तिलाजंली मिळाली आहे.पालिकेच्या  घन कचरा विभागाकडून शहरातील कचर्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला आहे. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशान भूमी, संतोषी माता रोड, पुना लिंक रोड, खडेगोलवली आय प्रभाग परिसरशंभर फुटी रोड, मलंगगड रोड भागातील कचरा कुंडया मधील कचरा उचलला जात नसल्याने  काही भागातील रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. शहरात साठणार्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लस्टिक पिशव्याचा समावेश असल्याने पालिकेने प्लॅस्टिक पिशव्या वर सुरू केलेली कारवाई ही दिखाऊ पणाची होती का असा सवाल उपस्थित  होत आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य भरात प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी आणली असून प्लॅस्टिक पिशव्यावर कारवाईचे आदेश दिले असताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर अद्यापही होत आहे. प्लास्टिक पिशव्यावरील कारवाई थंडावली असल्याने तसेच प्लॅस्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कारखाने पूर्ण पणे बंद केल्यास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जाणार नसल्या बाबत कल्याणातील सहयोग सामाजिक संस्था यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी पर्यावरण मंत्र्याना पत्र दिले असून कचऱ्या मध्ये व पावसाळ्या पूर्वी केल्या जाणाऱ्या नाले सफाईच्या गाळा मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या पिशव्या चा समावेश असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.पालिका प्रशासनाकडून कचरा उचलण्याच्या कामात नियोजनाचा अभाव असल्याने शहरात जागो जागी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याचे भोसले यांनी संगितले. पालिकेने कल्याण पूर्वेतील कचऱ्याची समस्यां निकाली काढण्यासाठी कचरा कुंड्या मधील कचरा वेळच्या वेळी साफ सफाई करावी तसेंच रस्त्यावर कडेला पडलेला कचरा त्वरित हटवावा यासाठी संबधित विभागाचे लक्ष वेधुनही संबधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कल्याण पूर्वेतील कचरा समस्यां नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे.

Post a Comment

0 Comments