एनआरसी कामगारांचा संघर्ष अद्यापही कायम


कल्याण : एनआरसी मॅनेजमेंट व त्यांच्याशी असलेली संलग्न असलेले युनियन मजदूर संघ यांनी एनआरसी कामगार यांचे जनजीवन विस्कळीत करून त्यांची हक्काची देणी मिळावी म्हणून अजूनही संघर्ष करावा लागत आहे. सुमारे चार हजार १५६ कामगार यापासून वंचित आहे.

 

आत्ताच्या शासकीय दरानुसारचे जमिनीचे भाव कमीत कमी १५ लाख रुपये गुंठा नुसार आहे. कंपनीची ५००  एकर जागा अवघ्या २१७ कोटीत अदानी समूहाला देण्यात आली असून व त्यातील कंपनीमधील चालू मशनरी भंगार स्वरूपात बाहेर काढून सुमारे हजार ते बाराशे कोटी रुपये हे देखील हडप करून कामगारांची दुर्दशा केली  आहे. या जमिनीवर विविध प्रकारचे लिटिगेशन असून त्याचे काय झाले व कसे केले हे अजून माहिती नाही. कामगार दिनी कामगारां मध्ये खूपच नाराजगी असल्याकारणामुळे कामगार दिन हा कामगार आमचा दिवस नसल्याचे दिसून येत होते. खऱ्या अर्थाने १३ ते १४ वर्षापासून वंचित असलेल्या हक्काची देणी मिळाल्यावरच कामगार वर्ग खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी होतील अशी प्रतिक्रिया कामगार नेते रामदास वळसे पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments