प्रत्येकवेळी पेन किलर्स घेणे टाळा – डॉ. प्रशांत पावशे


कल्याण :  अशक्तपणा आलायगरगरल्यासारखे होतेयअंग दुखतयआज डोक जाम दुखतयथोडी कणकण जाणवतेय अशा लहान सहान कारणांसाठी बरेचदा पेनकिलरचा पर्याय निवडतात. याने तात्पुरता आराम तर मिळतो मात्र हळूहळू त्याचे दुष्परिणामही शरीरावर दिसून येतात. चुकीच्या पध्दतीने घेतलीले औषधे अनेकदा जीवावर बेतु शकतात त्यामुळे  स्वतःच्या मनाने तसेच प्रत्येकवेळी पेनकिलर्स घेणे टाळण्याचा सल्ला कल्याण येथील आयुर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ प्रशांत पावशे यांनी दिला आहे.


घराघरात सर्रासपणे वापरली जाणारी वेदनाशामक औषधांविषयी अनेकांना पुरेशी माहिती नसते,  तर कित्येकांना हदयाचा विकार असल्याचे माहित नसल्याने काहीशी लक्षणे दिसताच पेन किलर्स घेण्याची वाईट सवय जडल्याचे दिसून येते. मनाने घेण्यात येणा-या या गोळ्यांमुळे अनेकदा रक्तदाब वाढू शकतो तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील वाढू शकतो.


 पेनकिलर्सच्या गंभीर दुष्परिणामांविषयी सांगतात डॉ पावशे म्हणतात की हे पेनकिलर्स किडनी, -हदय तसेच शरीरातील इतर अवयवांवर विपरीत परिणाम करतात. तसेच या गोळ्यांचे सेवन करताना उपाशी पोटी त्यांचे सेवन करणेएकाहून अधिक गोळ्यांचे घेणेप्रत्येक गोष्टीसाठी लगेचच गोळ्या घेणे टाळाअसह्य वेदना होत असल्यास स्वतःच्या मर्जीन औषधोपचार न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.


पेनकिलरचा अतिवापर हा मेंदुवर परीणाम करत असून मेंदुसंबंधीत आजारांमध्ये वाढ होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आलेले आहे. बरेच पेन किलर्स नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसआयडी) आहेत. कुठलीही पेन किलर विकत घेताना ती एनएसआयडी आहे कीनाही ते तपासून पाहा. जरतसे असेल तर मग या औषधाचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. 


तापवेदना दूर करज्ञ्यासाठी हे औषध वापरले जाते. त्यात स्टिरॉइड्स नसतात मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडहृदय आणि यकृतासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.वेदना कमी करणारे औषध म्हणून ओपिओईड्स देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते.


 कर्करोगाच्या उपचार दरम्यान वेदनेसाठी देखील यांचा वपर केला जातो. हे औषध दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्रहे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले गरजेचे आहे. या औषधामुळे बद्धकोष्ठतानैराश्यमूत्र संसर्गउलट्या यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इबुप्रोफेन पेन किलर्स पोटदुखीमूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येचा धोकादेखील वाढवतात.

Post a Comment

0 Comments