महानगर गॅसचे चुकीचे काम भाजप माजी नगरसेवकाचा आरोप


डोंबिवली ( शंकर जाधव ) नियमानुसार रस्त्याचे कडेला लाईन टाकण्याचे काम सुरु करताना अटीचे पालन करावे लागते. लाईन टाकण्याचे काम झाल्यावर रस्त्याला तडे पडणार नाही अश्या पद्धतीने खड्डे बुजविणे गरजचे आहे, मात्र डोंबिवलीत विविध ठिकाणी सुरु असलेले महानगर गॅस लाईन टाकण्याचे कामा झाल्यावर  खड्डा थुकपट्टी लावून बुजवला जात असल्याची वास्तविकता भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी दाखवून दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेजवळील रस्त्याच्या कडेला महानगरने गॅसने चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा आरोप करत म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना डोंबिवलीतील रस्त्याची अवस्था काय झाली आहे ते पाहावे असेही सांगितले.

  

डोंबिवली शहरातील अनेक ठिकाणी महानगर गॅस लाईन टाकण्याचे काम सुरु आहे.लाईन टाकून झाल्यानंतर खड्डा बुजवताना बुजवताना खडीकरण करून सील कोट करणे आवश्यक आहे.मात्र महानगरने गॅसने शहरातील नागरिकांचा आणि रस्त्याचा विचार न करता माती टाकून खड्डे बुजवले आहेत.अनेक रस्त्याच्या कडेला अशीच अवस्था आहे. मंजुनाथ शाळेजवळील रस्त्याच्या कडेला खड्डा चुकीच्या पद्धतीने बुजवील्याचे भाजप माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या निदर्शनात आले.शहरातील नागरिकांची फसवणूक होत असून यापुढे महानगर गॅस कंपनीला पालिका प्रशासनाने रस्ता खोदण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.


तर पालिका आयुक्तांचे डोंबिवली शहराकडे लक्ष नसल्याचे सांगत आयुक्तांनी डोंबिवलीतील रस्त्यांची पाहणी करावी असे म्हात्रे यांनी संगितले.तर परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments