पाणी प्रश्नासाठी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

 


कल्याण : गेली ५१ तास पाणी नसल्याने एमआयडीसी निवासीसह आजूबाजूच्या गावातील त्रस्थ नागरिक आपल्या मागण्या घेऊन एमआयडीसी कार्यालयावर आज धडकले. कार्यकारी अभियंता रमेश पाटील हे रजेवर असल्याने सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर, आणि कनिष्ठ अभियंता निलेश भोपाळेयांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्विकारले.


सर्व नागरिकांनी त्यांना आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या नंतर आणि दिलेल्या निवेदनातील मुद्दे यांची उत्तरे विजय धामापूरकर यांनी दिली असून त्याची पूर्तता पुढील काही दिवसांत ते करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसे ते लिखित स्वरूपात काही दिवसांत कळवीणार पण आहेत. या मोर्चाला ७५ हून अधिक नागरिक सुट्टीचा दिवस नसतानाही तर काहींनी कामावर दांडी मारून उपस्थिती लावली होती. खास करून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


या मोर्चात राजु नलावडेनंदू परबधर्मराज शिंदेभालचंद्र म्हात्रेविवेक देशपांडेसंजय चव्हाणविनय तटके,  करिश्मा प्रतापप्रिया व आनंद दामलेसतीश पाटीलकर्नल (निवृत्त) सी.आर. देशपांडेनिखिल कुलकर्णीकिरण भोसलेबेबीताई पाटीलसंध्या सराफनिर्मला मानकरअजय देसाईगंगा चंदउदयसिंग सुर्वे मुकुंद वैद्यराजु देवरासकर इत्यादी नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments