कल्याण - डोंबिवली शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंता पाटील यांची भेट

डोंबिवली ( शंकर जाधव ) भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता व कल्याण - डोंबिवली शहरातील पाणीटंचाई समस्या कायमची सोडवायची असेल तर मलंगगड पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावात कल्याण - डोंबिवली महापालिका मालकीचे स्वतंत्र धरण बांधणे हे गरजेचे आहे.


या संदर्भात कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची त्यांच्या वाळकेश्र्वर येथे असलेल्या  सेवासदन या  शासकीय बंगल्यावर संस्थेचे अध्यक्ष नितीम निकम आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी भेट घेतली. 


मंत्री पाटील यांनी संस्थेच्यावतीने लेखी निवेदन देण्यात आले.या विषयासंदर्भात मंत्री पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली.मंत्री जयंत पाटील संस्थेच्या  लेखी पत्रावर विभागाचे कार्यकारी संचालक (काेकण पा.वि.म.ठाणे )
कपोले यांच्या नावे " धरण करणे शक्य आहे का , तपासून मला सांगणे " असे लिहून आम्हाला त्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याचे सांगितले .


या संदर्भात आमचा पाठपुरावा हा सुरूच राहणार आहे ...
जलसंपदा मंत्र्यांची भेट मिळवून देण्यासाठी आमचे मुंबईतील मित्र व अल्पसंख्यांक राष्ट्रीय उपाध्यक्ष ( राष्ट्रवादी ) आसिफ भाई कुरेशी यांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आभार मानत असल्याबद्दल नितीम निकम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments