उथळसर प्रभाग समिती परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, डीपी रस्ता तसेच रंगरंगोटी कामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

■उथळसर प्रभाग समिती परिसरातील विविध स्वच्छता, रंगरंगोटी कामांची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा सोबत माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका नम्रता कोळी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे तसेच इतर अधिकारी....

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज उथळसर प्रभाग समिती परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, डीपी रस्ता तसेच रंगरंगोटी कामांची पाहणी केली. दरम्यान शहरात सुशोभिकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. शर्मा यांनी संबंधितांना दिले.  


         आज महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी उथळसर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका नम्रता कोळी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त दिनेश तायडे, उप आयुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.


       यावेळी स्व. मीनाताई ठाकरे चौक सुशोभिकरण प्राधान्याने सुरु करणे, शहरातील सर्व उड्डाणपुलांखाली सुशोभिकरण करणे, जोगिला तलाव पुनर्विकास प्रकल्प त्वरीत सुरु करणे, मुस्लिम कब्रस्तान आवश्यतेनुसार माती उपलब्ध करुन देणे,  मनोरपाडा तसेच आंबेडकर रोड परिसरात निर्मल अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार पुढील कार्यवाही करणे, मनोरपाडा परिसर, मनोरपाडा ते आंबेडकररोडपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, आंबेडकर रोड नाल्यावरील दोन ब्रिजचे स्ट्रक्चर ऑडीट करुन पुढील कार्यवाही करणे, आंबेडकर रोड परिसरातील दोन धोकादायक शौचालयांची जाहिरातीचे अधिकार प्रदान करुन पुनर्बांधणी करणे,


       तसेच एमटीएनएलचे धोकादायक भिंत संदर्भात पत्र व्यवहार करणे, एमटीएनएल कार्यालयासमोरील डी.पी रस्त्यात बाधित होणारी घरे एसआरए योजने अंतर्गत समाविष्ट करुन डी.पी. रस्त्याचे काम सुरु करणे, गीता सोसायटी समोरील जुने भंगार बाईक उचलणे, जुना एलबीएस मार्गावरील दुभाजकाची रंगरंगोटी व आवश्यकतेनुसार वृक्षारोपन करणे, परिवहन बस थांब्यावर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरातदारांचे विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 


          पोलिस वसाहत इमारत क्र . १ , २ , ४ , ५ व ६ मधील अंतर्गत सी.सी. कामे करणे, सेंट जेम्स ख्रिश्चन दफन भूमीत प्रकाश व्यवस्था करणे जेल तलावासमोरील दुभाजकाची रंगरंगोटी करणे तसेच जेल तलाव परिसरात रंगरंगोटीची कामे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. 

Post a Comment

0 Comments