कल्याण : वीज बिलांसोबत अनामत रक्कम दंड वसूल न करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने केली असून याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.
गेले दोन वर्ष या जगावर कोरोनाचं संकट होतं. अशा काळातही राज्य सरकारने वीज बिल कमी करण्याऐवजी प्रचंड मोठ्या प्रमाणात दर वाढ केली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय गेले तरीही राज्य सरकारला जाग येत नाही. अतिशय मोठ्या प्रमाणात कोरोना असताना विज बिल वाढवलं.
आता पुन्हा वीज ग्राहकाकडून अनामत रक्कम घेण्याचा सपाटा लावलेला आहे. हे अतिशय चुकीचं नागरिकांना भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे बिल भरल्याशिवाय मीटर जोडत नाही विज देत नाहीत. एक महिना सुद्धा थांबत नाही तरीही आता अनामत रक्कम घेऊन सर्व वीज ग्राहकांना हा त्रासदायक निर्णय मान्य नाही.
त्यामुळे तातडीने हा निर्णय थांबवून व कुणाकडून ही अनामत रक्कम स्वीकारू नये अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली. यावेळी नंदू जोशी, नंदू परब, नाना सूर्यवंशी, संजू बिडवाडकर, रवी सिंग ठाकूर, मितेश पेणकर, आशिष पावसकर, विनीत गव्हाणकर, संतोष आतकरे, शिवम शुक्ला, संतोष दुबे, अमित देवस्थळी, रुपेश पवार, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments