जैन मंदिरा जवळ बीट पोलिस चौकी उभारण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे , प्रतिनिधी : ठाण्यातील जैन मंदिरासमोरच जैन भाविकांची दुचाकीवरून आलेल्या चोरांनी चैन चोरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या मंदिराजवळ बीट पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर काॅग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे.


           ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे व नौपाडा झोन सहायक पोलीस आयुक्त सौ.सोनाली ढोले पाटील यांची भेट घेऊन सचिन शिंदे यांनी ही मागणी केली या प्रसंगी बोलताना त्यांनी सागितले की,ठाणे नगर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरी चैन स्नॅचिंग सारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून आपणाकडूनही यावर आळा बसावा म्हणून योग्य ते प्रयत्न चालू आहेत.


        आपल्याच हद्दीत विविध महत्त्वाचे भाग येत असून विविध सरकारी कार्यालयापासून ते ठाण्यातील महत्वाचे असे धार्मिक स्थळेही आपल्याच हद्दीत येत आहेत.कालच टेम्भी नाका येथील जैन मंदिरासमोरच एका महिलेची चैन स्नॅचिगची घटना घडली आहे या मंदिरात रोज शेकडो भाविक नित्यनेमाने येत-जात असतात व या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहात आहे व पुढील महिन्यातच जैन बांधवांचा चातुर्मास येणार आहे 


       या भागात यापूर्वीही अशा घटना या परिसरात घडलेल्या आहेत भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून या ठीकाणी कायमस्वरूपी एक बीट पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी अशी मागणी सचिन शिदे यांनी केली आहे.या प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी अफजल तलवलकर,अमोल गांगुर्डे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments