कल्याण : मागील २ वर्षांपासून कोविड महामारीमुळे महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवस शाळेत साजरा होऊ शकला नाही. परंतु या वर्षी आर्य ग्लोबल ग्रुप, आर्य गुरुकुल नांदिवली, व सेंट मेरी हाय स्कूल चक्कीनाका मध्येही महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना शाळेच्या संचालिका डॉ. निलम मलिक, शिक्षणासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याची माहिती दिली, त्याचप्रमाणे आज आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल च्या वतीने १८० हुन अधिक ताई व दादांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.” कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पालकवर्ग तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ९:३० वाजता स्वामीनी निष्कलानंदा अम्माजी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करण्यात आली. या मंगल समयी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन केले गेले. क्रिशंक मलिक व भूमिका मलिक यांनी सर्वाना महाराष्ट्र दिवस तथा कामगार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आर्यगुरुकुल शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित सगळ्यांचे मन जिंकून घेतले. शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी विविध भाषेतून आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या महाराष्ट्राच्या प्रति प्रेम जागरूक करण्यासाठी शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात समाज सेवकांनी लढा दिला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेल्या स्वातंत्र भारतात मुंबई सहित महाराष्ट्राचा १मे १९६० हा स्थापना दिवस आहे. ऐतिहासीक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा, दैदिप्यमान व प्रेरणादायी असलेला महाराष्ट्र राज्याचा देशाच्या विकासात सिंहाचा वाट उचलणारा महाराष्ट्र हा राज्य आहे.
संत, महंत ऋषी - मुनी व शूर वीरांची भूमी असलेला महाराष्ट्र. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, संस्कृती, सहका
0 Comments