मॅक्सहबने अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह उत्पादने प्रस्तुत केली पाम एव्ही-आयसीएन एक्स्पो २०२२ मध्ये सहभाग घेतला ~


मुंबई, २७ मे २०२२: परस्परांशी संवाद साधत तसेच समन्वयपूर्वक काम करता यावे यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांचा जागतिक पातळीवरील आघाडीचा ब्रँड मॅक्सहबने मुंबईमध्ये २६ ते २८ मे २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाम एव्ही-आयसीएन एक्स्पो २०२२ मध्ये भाग घेतला आहे.


व्यवसायांना पुनर्जीवित करणारा आणि प्रदर्शकांना व्यापक आणि महत्त्वपूर्ण खरेदीदार समुदायांशी जोडणारा प्रभावी मंच या एक्स्पोमध्ये उपलब्ध होतो. याठिकाणी मॅक्सहबने अत्याधुनिक इंटरॅक्शन तंत्रज्ञान प्रदर्शित केले, हे तंत्रज्ञान रिटेल, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, कॉन्फेरेंसिंग इत्यादी व यासारख्या वातावरणासाठी अनुकूलित करण्यात आले आहे.


मॅक्सहबने आपली अनेक उत्पादने याठिकाणी प्रस्तुत केली, यामध्ये एम४०, रॅप्टर सीरिज एलईडी व्हिडिओ वॉल आणि डिजिटल साईनेज यांचा समावेश आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या संबंधित मॉडेल्समध्ये एम४० - ३६० डिग्री कॅमेरा, ४३", ५५" पोर्ट्रेट मोड आणि ६५" लँडस्केप मोड, १३८" रॅप्टर सीरिज यांचा समावेश आहे.


सीव्हीटीई भारत आणि सार्क क्षेत्रांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री अविनाश जोहरी यांनी सांगितले, "पाम एक्स्पो २०२२ मध्ये सहभागी होऊन आम्हाला खूप आनंद होत आहे. आजच्या काळात प्रत्येक उद्योगाला प्रभावी पद्धतीने काम करता यावे यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, आमच्या परस्पर संवाद आणि समन्वय उत्पादनांना प्रदर्शित करण्यासाठी मंच या एक्स्पोमध्ये उपलब्ध झाला आहे. 


अशाप्रकारचे मंच तुम्हाला दुसऱ्या हितधारकांसोबत सहयोग करण्याच्या संधी देतात, ज्यासाठी एकात्मिक उपायांची गरज असते आणि याठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष उत्पादनाचा अनुभव घेऊ शकता. आमच्या नव्या उत्पादनांसह, वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांच्या संवादाशी संबंधित वाढत्या गरजा पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला विश्वास वाटतो की अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली ही उत्पादने उद्योगांना त्यांचे संचालन अधिक क्षमतेने करण्यात मदत करतील."


प्रस्तुत केलेली उत्पादने:

१. एम४० - ३६० डिग्री ऑल इन वन कॅमेरा: छोट्या ते मध्यम आकाराच्या मीटिंग जागांसाठी कॉन्फरेंसिंग उत्पादन आहे. हे उत्पादन छोट्या आकाराच्या मीटिंग जागांसाठी डिझाईन करण्यात आले आहे. युसी एम४० प्रत्येक चेहरा ट्रॅक करतो आणि मीटिंग रूमच्या टेबलवर मधोमध ठेवल्यास त्याठिकाणी बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला फॉलो करतो.


२. डिजिटल साईनेज: डिस्प्ले इंडस्ट्रीच्या अनेक वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. अँड्रॉइड, विंडो आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम्ससोबत हे चालवले जाऊ शकते. हे उत्पादन रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि वाणिज्यिक उद्योगांमध्ये अधिक चांगली कामगिरी बजावता यावी यासाठी आवश्यक सुधारणा घडवून आणते.


३. रॅप्टर सीरिज एलईडी व्हिडिओ वॉल: कोणत्याही अडथळ्याविना, आकर्षक डिस्प्लेसाठी ऑल इन वन उत्पादन. उद्योगांच्या आवश्यकतेनुसार अनेक उपलब्ध आकारांमध्ये कस्टमाइज केले जाऊ शकते.

Post a Comment

0 Comments