होमगार्ड, नागरी संरक्षण दलात काम करणाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


कल्याण कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ मे रोजी सिध्दिविनायक मंदिर धर्मशाळेत  महासमदेशक होमगार्डनागरी संरक्षण,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ठाणे, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने "आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे" आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील,   प्रांत अधिकारी कल्याण  अभिजित भांडे पाटीलतहसीलदार  जयराज देशमुखकल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  राजू वंजारी  हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी  अपर पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित १५०  होमगार्ड यांना  हे प्रशिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करावे असा बहुमोल सल्ला दिला. राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रशिक्षण ३ जून पर्यंत सुरू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments