टिटवाळ्यातील करुणा मैराळे राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन

कल्याण : पुणे येथे १ मे ते ४  मे या दरम्यान १० व्या सबज्युनिअर मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत टिटवाळा येथील  व ठाणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची खेळाडू करुणा मैराळे हिने उत्कृष्ठ कामगिरी करत कांस्य पदक मिळवले.


 

करुणा ने पहिला सामना उपांत्यपूर्व फेरी पुण्याच्या स्नेहल जावरी विरूद्ध पहिल्या राऊंड मध्येचतर  सेमीफायनल सामन्यात अकोल्याची भक्ती वाघमारे हिच्याकडून गुणांच्या फरकाने हार पत्करावी लागली व कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. करुणा ही शकुंतला विद्यालय टिटवाळा येथे  शिकत असून यावर्षी सातवीची परीक्षा दिली आहे. विनायक बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक संतोष मुंढे यांच्या मार्गदरशनाखाली मागील ३ वर्षापासून सराव करीत आहे.टिटवाळ्यातील मुलींमध्ये पदक मिळविणारी पहिलीच बॉक्सर आहे. करुणाचे वडील संजू मैराळे यांनी आपल्या मुलासोबत मुलगी करुणा हिला सुद्धा  बॉक्सिंगसाठी प्रोसाहन दिल्याने तिने आज यश मिळवले. तसेच विनायक बॉक्सिंग क्लबचे अध्यक्ष विनायक कोळी   ठाणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष मिलन वैद्य व सचिव सागर पेडणेकर यांनी हे नेहमीच खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोसाहन देत असतात. 

Post a Comment

0 Comments