भिवंडीतील आवळे ग्रुप सेवा सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विनोद पाटील यांची निवड


भिवंडी  दि.31(प्रतिनिधी ) आवळे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी विनोद पाटील व अनंता भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे.आवळे, विश्वगड, चाणे, वारेट, साईगांव, अस्नोली, दुगाडफाटा, पालखणे, पालखणे(गेट), धोंडावडवली (पूर्व) व धोंडावडवली(पश्चिम) कोरडेपाडा या १२ गावांचे कार्यक्षेत्र असलेली आवळे ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही मोठी आर्थिक उलाढाल असलेली भिवंडी तालुक्यातील शेतकर्रयांची नामांकित व प्रतिष्ठेची सहकारी संस्था समजली जाते.


सेवा सोसायटीचे सभापती बाळू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विशेष सभेत विनोद पाटील व अनंता भोईर यांची  तज्ञ संचालक पदी बिनविरोधपणे निवड करण्यात आली. या संस्थेच्या व शेतकरयांच्या हितासाठी आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे विनोद पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.


सदर  निवडी बद्दल विनोद पाटील व अनंता भोईर यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील, राजेंद्र गायकर , पवन देसले, शरद भोईर, नरेश पाटील यांची त्यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments