ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी संदीप चव्हाण यांची नियुक्ती


ठाणे दि.५ ( जि. प) : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी श्री. संदीप चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते उल्हासनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता पदी कार्यरत होते. 


श्री.चव्हाण हे २००८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सह्यायक अभियंता पदी नियुक्त झाले. मागील १४ वर्षांपासून ते विविध पदांवर सेवा बजावत आहेत. त्यांनी  रायगड जिल्हा परिषदेच्या  सुधागड पाली, मुरुड तसेच अलिबाग येथे उप अभियंता म्हणून काम केले. या काळात 


रायगड किल्ला संवर्धनाचे त्यांनी काम पाहिले. त्यानंतर कल्याण बांधकाम उपविभाग तसेच उल्हासनगर सा. बां. उपविभाग येथे काम केल्यानंतर पदोन्नतीने ते ठाणे जिल्हा परिषद येथे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी नियुक्त झाले आहेत.  

Post a Comment

0 Comments