अप्पर ठाणे क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स, यूटी स्ट्राईकर्स अजिंक्य


भिवंडी, दि. २ (प्रतिनिधी) : यूटी स्ट्राईकर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अप्पर ठाणे प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत पुरुषांच्या गटात यूटी स्ट्राईकर्सने, तर महिलांच्या गटात पॉवर हिटर्सने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेतील अनेक लढती चुरशीच्या झाल्या. त्या पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.


अप्पर ठाणे विभागातील खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी यूटी स्ट्राईकर्सतर्फे अप्पर ठाणे प्रिमियर लिग स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत २१ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे विविध चुरशीच्या लढती नागरिकांना पाहावयास मिळाल्या. त्याचबरोबर खेळाडूंनाही नागरिकांकडून प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे दोन दिवसांची स्पर्धा खेळाडू व नागरिकांसाठी अविस्मरणीय झाली होती.


या स्पर्धेचा बक्षीस समारंभ राम माळी, सुनिल भोईर सर आणि अप्पर ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.अशाच पद्धतीने दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याची अपेक्षा अप्पर ठाण्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments