पुणे ज्योती इंडस्ट्रियल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एस.एस.टी. महाविद्यालयाची शिल्पा केंबळे तृतीय

                          


कल्याण : पुणे पिंपरी चिंचवड येथे ज्योती इंडस्ट्रियल २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही मॅरेथॉन पुणे पिंपरी-चिंचवड इथून सकाळी साडेपाच वाजता सुरू करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण पाचशे ते सहाशे स्पर्धक सहभागी झाले होते. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एस.एस.टी. महाविद्यालयातील खेळाडू शिल्पा केंबळे हिने १ तास २० मिनिट ही वेळ देत २१ कि.मी.अंतर पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावला.


या कामगिरी बद्दल ट्रॉफी आणि रोख रक्कम देत शिल्पाचा सन्मान करण्यात आला. एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी,  उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवारमहाविद्यालयाचे मार्गदर्शक संदेश चव्हाण यां सर्वांनी शिल्पाचे  अभिनंदन केले आणि तिला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments