पोलिसांना तिसरा डोळा असलेले `खबरी` मिळेना... सहाय्यक पोलीस आयुक्तांची माहिती


डोंबिवली ( शंकर जाधव ) गुन्हेगारी विश्वाचे हात-पाय मोडीत काढत गॅगवॉर संपवण्यासाठी १९९० ते २००० च्या काळात`खबरी` हे पोलिसांचा तिसरा डोळा समजले जायचे.मुंबईतील अंडरवर्ल्डमधील गुपित, गॅगमधील शुटर,सुपारी यांची तंतोतंत माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळायची.आपल्या हालचाली पोलिसांपर्यत कश्या कळतात हे गुपित अंडरवर्ल्डला सुरुवातीला न समजल्याने आपल्यातील फुटीर कोणी आहे कां असा संशय यायचा.पण खबऱ्यांना सेफ ठेवण्याचे काम पोलीस करत असल्याने गुंडांना यांची माहिती मिळत नसे.काळ बदलल्याने डिजिटलच्या युगात असे खबरी पोलिसांना मिळेनासे झाले आहेत.


     आता जिवंत व्यक्तीकडून जेवढी माहिती मिळत नाही त्यापेक्षा जास्त माहिती सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मिळते.मात्र आजच्या या काळात पोलिसांना खबरी मिळत नसल्याची खंत डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केली. भाजपा माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील मॉडेल इंग्लिस शाळेच्या केरळीय समाजमस सभागृहात मोफत सीसीटीव्ही कॅमरे वाटप करण्यात आले.


    यावेळी पाहुणे म्हणून डोंबिवली सहाय्यक आयुक्त जयराम मोरे, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनी पंढरीनाथ भालेराव उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे व प्रमुख पाहुण्याचे हस्ते सोसायटीतील सदस्यांना मोफत सीसीटीव्ही कॅमरे देण्यात आले.


     यावेळी माजी नगरसेवक विकास म्हात्रे म्हणाले,२०१५ साली ५०० सीसीटीव्ही कॅमरे वाटप करण्यात आले. यंदा १११३ सीसीटीव्ही कॅमरे दिले असून प्रभागातील १४० इमारती आणि सुमारे ४० चाळींमध्ये हे कॅमेरे लावले जाणार आहे.सोसायट्यांमध्येहि डीव्हीआर लावून कॅमेरे लावणे आवश्यक आहे`आपल्या देशासाठी ! आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी` पोलिसांकडून सुरु असलेल्या या उपक्रमात आमचा हा खरीचा वाटा आहे.


      डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे म्हणाले, पूर्वी खबऱ्यामुळे माहिती मिळत होती.आता खबरी कमी झाले असले तरी शहरातील विविध ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमरे हे खबऱ्यांंपेक्षा कमी नाही.दोन महिन्यांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध महिलेची हत्या झाली होती.      मारेकरी महिलेकला चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसला नसला तरी तिची साडी दिसली.हाच धागा पडकून पोलिसांनी तपास लावला आणि मारेकरी महिला गजाआड झाली.सोसायटी, व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे समाजाच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहेत.तर वपोनि भालेराव यांनी उपस्थितांना समस्येबाबत आवाहन केले असता अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या.

Post a Comment

0 Comments