वंचितच्या वतीने डोंबिवलीत शांतता रॅली


डोंबिवली ( शंकर जाधव ) वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांच्या आदेशानुसार 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारत देशात शांतता राहावी सर्व धर्म जाती आपुलकीने ऐकतेने बंधूभावाने राहावे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या डोंबिवली पूर्व, पश्चिम व महिला आघाडी वतीने डोंबिवलीत शांतता रॅली काढण्यात आली.

   
महिलांना शिक्षणाचे दार उघडून देणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्व धर्म जातीला एकत्र करून संविधानाच्या चौकटीत बसवून ज्यांनी महान कार्य केले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्या पर्यंत वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पूर्व, पश्चिम व महिला आघाडी वतीने शांतता रॅली काढण्यात आली होती.


रॅलीचे नेतृत्व डोंबिवली पू. अध्यक्ष सुरेंद्र ठोके, पश्चिम अध्यक्ष गौतम गवई, महिला अध्यक्ष अस्मिताताई सरवदे,यांनी केले निमंत्रक महासचिव चंद्रकांत पगारे, सचिव सुरेखा जाधव ,महेंद्र बर्वे, संदीप कदम,सुशील कांबळे ,करुणा जाधव,सुरेश हळदे,गणेश गायकवाड, महासचिव वैशाली  कांबळे, सचिन बाजीराव माने, उपाध्यक्ष राजू काकडे, सलीम आववृद्दीन,मौलाली शेख,पूजा कांबळे, आशाताई ठोके, अर्जुन केदार,अशोक गायकवाड, विजय इंगोले, सुदेश कदम, विलास मोरे, दीपक भालेराव, कल्याण ग्रामीण अध्यक्ष राहुल जाधव, राजू खरात, शांताराम तेलंग  वसंत काकडे संतोष खंदारे दत्ता शेळके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments