राष्ट्रीय एकात्मता शिबिरात एसएसटी महाविद्यालयाचा सहभाग

कल्याण : राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या एनएनएस सेल ने याचे यजमान पद स्वीकारले असून नुकतेच या शिबिराचे उदघाटन पार पडले. 


एकूण २८ विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणारे १२ राज्यातील २२० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होत आहेत. यामध्ये ७ दिवसात टॅलेंट शो, स्किट्स, नृत्य, गाणी इ. विविध प्रकारचे सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रम आयोजित केले जातील.  आपल्या देशाची समृद्ध संस्कृती आणि वारसा जतन करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. 


यामध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या निशांत मेश्राम या एनएनएस स्वयंसेवकाची ही निवड झाली असून सोबतच एसएसटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि एनएनएस चे ठाणे जिल्हा समनवयक प्रा जीवन विचारे आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा मयूर माथूर यांची ही आयोजन समिती मध्ये निवड झाली आहे.


या शिबिराचे उदघाटन डॉ.कमल कर उपसंचालक एनएसएस , नवी दिल्ली, प्रा. सुहास पेडणेकर कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, डॉ.प्रशांत वनांजे एसएलओ, महाराष्ट्र सरकार, सी. कार्टिगुएन प्रादेशिक संचालक, महाराष्ट्र आणि गोवा, प्रा सुधीर पुराणिक ,कुलसचिव मुंबई विद्यापीठ, प्रा रमेश देवकर, कार्यक्रम अधिकारी , एनएसएस  विभाग, मुंबई विद्यापीठ, प्रा सुशील शिंदे, ओएसडी  या मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.


 याप्रसंगी एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याचे दिमाखदार सादरीकरण करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.

Post a Comment

0 Comments