ब्रह्मांड परिसरात आधारकार्ड कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

 


ठाणे , प्रतिनिधी : ठाणे आमदार मा.श्री. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार सेवाभावी संस्था अंतर्गत श्री. व्ही. शिवकुमार (ब्रह्मांड हौसिंग फेडरेशन) व श्री. राजेश जाधव (भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष व संस्थापक ब्रह्मांड कट्टा परिवार) यांच्या संयुक्त विद्यमाने *आधार कार्ड कॅम्प* दिनांक 6 मे ते 13 मे सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.


या आधारकार्ड शिबीराअंतर्गत नवीन आधारकार्ड, जुन्या आधारकार्डमध्ये डेमोग्राफिक बदल ( नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, जन्मतारीख, स्त्री/ पुरुष जेंडर इत्यादी), जुन्या आधारकार्डमध्ये बायोमेट्रिक बदल (फोटो, फिंगरप्रिंट, आय स्कॅन) , डाऊनलोड व कलर प्रिंट ईत्यादी सेवा देण्यात येणार आहेत. सहा मे रोजी सुरु झालेले हे शिबीर आठ दिवस चालणार असून पहिल्याच दिवशी या आधारकार्ड शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.


समाजसेवा व सामाजिक उन्नतीसाठी बांधिल असून भविष्यात असे अनेक उपक्रम व सेवा राबवत राहू असे प्रतिपादन भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष व सामाजिक सांस्कृतिक कार्यकता ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक जनसेवक राजेश जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments