तेजस्विनी कोकण बाजार' या प्रदर्शनातुन जमा रक्कम विधवा,गरीब,अपंग व गरजू महिलांना देणार


डोंबिवली ( शंकर जाधव ) आखिल भारतीय महिला मराठा महासंघाने डोंबिवलीतील जोंधळे हायस्कूलच्या मैदानावर  'तेजस्विनी कोकण बाजार' या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांनी उत्पादीत केलेल्या अनेक उत्पादनांचा समावेश होता.


 यावेळी अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या अध्यक्षा वैशाली जोंधळे  म्हणाल्या, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, अल्पबचत गटातील महिला संघटीत व्हाव्यात, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे मिळावेत या हेतूने तेजस्विनी कोकण बाजाराचे  आयोजन केले. 


प्रदर्शनातून  जमा झालेली सर्व रक्कम पूर्णपणे समाजातील विधवा.गरीब. अपंग.व गरजू महिलांसाठीच वापरली जाणार आहे. या महिलांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तेजस्विनी कोकण बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ८० स्टाँल होते २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसात या प्रदर्शनास हजारो लोकांनी व मान्यवर व्यक्तींनी भेट दिली आणि आखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन विनामूल्य होते.

Post a Comment

0 Comments