विविध सामाजिक उपक्रम राबवत सुबोध भारत यांचा जन्मदिन साजरा


कल्याण : बहुजन विकास संघ माता रमाई सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध भारत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.बहुजन विकास संघ माता रमाई सार्वजनिक जयंती कल्याण पूर्वचे माजी अध्यक्ष व तरूण समाजसेवक सुबोध भारत यांचा वाढदिवस तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथील डॉ. रुग्ण मित्र अनाथ आश्रम येथे गरीब गरजू अनाथांना साडी, अन्न व छत्री वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे टिटवाळा येथील पारस बालभवन वृद्धाश्रम येथे भोजन, शालेय साहित्य, छत्री, खेळणी आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, केतन रोकडे, अमित सोनावणे, राहुल कासारे, अतुल भोसले, राजाराम आव्हाड, अनिल भोरंडे, कामेश जाधव, मंगेश जाधव, पराग मेंढे, आलका साळवी, मिरावासेन पूजा, सुबोध भारत आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments