भारतात वर्षाला एक लाखार्पयत नेत्रदान होण्याची गरज नेत्रदानाची जनजागृती आवश्यकता --- डॉ. विनायक दामगुडे


डोंबिवली ( शंकर जाधव )  भारतात वर्षाला एक लाखा र्पयत नेत्रदान होण्याची गरज असली तरी त्या तुलनेत नेत्रदान होत नाही. फक्त 25 हजार नेत्रदानातील शस्त्रक्रिया होतात. नेत्रदानाबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. नागरिकांनी देखील मोठय़ा प्रमाणात नेत्रदान करावे असे आवाहान डॉ. विनायक दामगुडे यांनी डोंबिवलीत केले. 


डोंबिवलीत एएसजी समूहाच्या नेत्र रूग्णालया तर्फे उद्घाघाटन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दामगुडे यांनी  माहिती दिली. प्रत्येकाला उत्तम प्रकारे नेत्रोपचार मिळावेत तसेच कोणाताही भेदभाव न करता समान उपचार पध्दती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या समूहाची स्थापना करण्यात आली. एएसजी आय समूहाचे 15 राज्यांमधील 38 शहरांमध्ये 44 रु ग्णालये आहेत. डोंबिवली येथील समूहाची ही पाचवी शाखा असून डॉ. हरीश पाठक, डॉ. हर्षवर्धन रेड्डी सी. , डॉ. प्रमोद बी लेंडे आदी पत्रकार परिषदेत बोलत होते.


दरम्यान डॉ. हरिश पाठक यांनी सांगितले, सध्याच्या पिढीला चष्मा लावणे आवडत नाही. चष्मा काढून टाकण्यासाठी दोन पध्दती आहेत. एक लेझर पध्दती आहे. त्यात लेझरच्या साहाय्याने वरच्या वर शस्त्रक्रिया केली जाते. दहा ते पंधरा मिनिटात ही होती. डोळ्य़ांच्या आत जावे लागत नाही. चांगला रिझल्ट देणारी ही शस्त्रक्रिया आहे. लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे.


 लहान मुलांची वेळोवेळी नेत्र तपासणी करण्याची गरज आहे. अनेकदा मुलांना चष्मा आहे पण ती गोष्ट त्यांना माहितीच नसते. परदेशात जन्मानंतर लगेचच आणि शाळेत जाण्यापूर्वी देखील नेत्र तपासणी केली जाते. पण आपल्याकडे तसे काही होत नाही असे ही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments