निस्वार्थ बुद्धीने समाजसेवा व सामाजिक उद्बोधन घडले पाहिजे- डाॅ राम नेमाडे


डोंबिवली ( शंकर जाधव ) निस्वार्थ बुद्धीने समाजसेवा व सामाजिक उद्बोधन घडले पाहिजे साहित्यिकांनी लहान-सहान यशाने हुरळून न जाता अभ्यास करून उच्चप्रतीची साहित्य निर्मिती केली पाहिजे असे प्रा.डॉ.राम नेमाडे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सांगितले.

   


मुक्ताई सेवा सहायक संघाच्या वतीने लेवा भवन येथे पार पडलेल्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश वराडेयांचे सह डॉ. विवेक महाजनडॉ. धनराज पाटील,जनार्दन जंगलेवायकोळे, महेश चिरमाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा.डॉ.राम नेमाडे यांनी भूषविले. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी श्यामसुंदर पाटीलकृषी क्षेत्रातील प्रध्यापकांपासून शिक्षण संचालक(कृषी) डॉ.प्रभाकर वराडेवनरक्षक द.रा.पाटील, प्रसिद्ध लेखक तथा लेवा इतिहासकार डाॅ. नि.रा.पाटील यांना मुक्ताई सेवा सहायक संघाच्या वतीने मानपत्र,शाल-श्रीफळ व जीवन गौरव पुरस्कार, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. हेमंत नेहेते यांनी  कार्यक्रमात सक्रिय हातभार लावला.  

   


श्यामसुंदर पाटील यांनी स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व विशद करून सांगितले व महाराष्ट्रीयन तरूणांना एमपीएससी परीक्षा देऊन शासकीय सेवेत आपला ठसा उमटवला असे सुचवून आपण या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करायला केव्हा तयार असल्याचे जाहीर केले. डॉ.प्रभाकर वराडे यांनी कृषी क्षेत्रातील प्रध्यापकांपासून शिक्षण संचालक(कृषी) अशा आपल्या उच्चतम पदावर केलेल्या कामगिरीचा उल्लेख करून या क्षेत्रातील कुरघोडी व भेदप्रवृतीवर विचार मांडले. द. रा. पाटील यांनी वनरक्षक पदाची जबाबदारी सांभाळताना येणाऱ्या समस्याजिवावर बेतण्याचे प्रसंग,वरिष्ठांची अनास्था यावर माहिती दिली
डाॅ.नि.रा.पाटील यांनी लेवागणबोली शब्दकोश निर्मितीलेवागणबोली बोलीभाषेचा स्वतंत्रता व साहित्य यांसंबधी आपले विचार मांडले. गडकिल्ले संशोधनहिंदवी स्वराज्याची दुर्गतीर्थेपौराणिक कादंबऱ्याचे लेखन याविषयी तसेच लेवापाटीदार समाजाच्या स्थलांतराचा रोचक इतिहासही सांगितला.मुक्ताई सेवा सहाय्यक संघाचे अध्यक्ष रवी पाटील प्रतिभाग्रज 'यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आचारविचार व उच्चार यांवर जोर दिला पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनची जबाबदारी राजेश ढाके व प्रवीण झोपे यांनी तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी विनायक पाटील यांनी सांभाळली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments