भिवंडीतील पडघा परिसरात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ११ कोटींचे रस्ते,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कडून भूमिपूजन

भिवंडी, दि. 9 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून भिवंडी तालुक्यातील पडघे परिसरात ११ कोटी रुपयांच्या तीन रस्त्यांचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून भिवंडी तालुक्यात मोहिली-दुगाड-गदऱ्याची वाडी रस्ता, चावे-भरे-लाप रस्ता आणि दलेपाडा वाफाळे पडघा-शेरेकर पाडा चिंबीपाडा (आदिवासीपाडा) जुपाडा रस्ता आदी रस्ते मंजूर झाले आहेत. 


या रस्त्यांच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रेया गायकर, दयानंद पाटील, पी. के. म्हात्रे, शांताराम पाटील, दशरथ पाटील, यशवंत सोरे, श्रीकांत गायकर, बाबुभाई शेख आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकास विभागाला भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून महाराष्ट्रात ३६०० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.


 त्यात ठाणे जिल्ह्यातील काही कामांचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी दिली. पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दुर्गम भागातील रस्त्यांचीही कामे करण्यात येत आहेत. मात्र, काही कंत्राटदारांमुळे कामांचा दर्जा राहत नाही, ही खंत आहे. त्यासाठी आपल्या भागातील रस्त्याचे काम सुरू असताना, ग्रामस्थांनीही लक्ष ठेवायला हवे. 


काही दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ग्रामस्थांनी रोखले होते. त्यावेळी पोलिसांनीही हस्तक्षेप केला. मात्र, रस्त्याचा दर्जा चांगला ठेवावा, अशी ग्रामस्थांनी ठाम भूमिका ठेवली होती, अशी माहिती श्री. कपिल पाटील यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments