महापालिका अधिकारी करतात आयुक्तांची दिशाभूल आयुक्तांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन दौरा करावा - काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे

ठाणे , प्रतिनिधी : कालच आयुक्त यांनी 40 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा केला असता आज शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केविला येथील नालेसफाईचे कामाला अजून सुरूवातच झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले दोनच दिवसापूर्वीच या परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी आयुक्त यांनी केली होती मग या नालेसफाई नक्की कुठे झाली?असा सवाल केला.


          पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण ठाण्यातील नालेसफाई पूर्ण होईल व 40 ते 50 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे अशी माहीती ठाणे महापालिका आयुक्त यांनी दिली होती, परंतु अद्यापही ठाण्यातील अनेक ठीकाणी नालेसफाईचे कामच सूरू झाले नसल्याची माहीती काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली ठाण्यातील जवळपास 50 फूट रूंद असलेल्या व मोठ्या प्रमाणात ठाणे शहरी भागातील पाणी जात असलेला केव्हिला परिसरातील नालेसफाईला अजून सुरूवात देखील झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले दोनच दिवसापूर्वीच या परिसरात आयुक्तांचा दौरा झाला होता मग ठाणे महापालिकेतील अधिका-यांनी या नाल्याची पाहणी का केली नाही? असा सवाल केला.


             याप्रसंगी बोलताना सचिन शिंदे यांनी सागितले की,ठाणे महापालिका आयुक्त यांना अधिकारी नियोजित जागीच घेऊन जातात व सर्वत्र व्यवस्थित काम चालू असल्याचे भासवून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आयुक्तही अधिका-यांवर विश्वास ठेवून आपला दौरा पार पाडतात मात्र खरी परिस्थिती आयुक्तांसमोर येतच नाही आयुक्तांचे दौरे हे अधिकारी निश्चित करतात पण ज्या ठीकाणी आयुक्त जाणे गरजेचे आहे .


            तेथे नेले जात नाही म्हणून आयुक्तांनी सुद्धा यापूढे कोणत्याही कामाची पाहणी करताना ज्या भागाचा दौरा करणार आहेत त्या भागातील स्थानिक नागरिकांना या दौऱ्याची पूर्वसूचना द्याव्यात व या दौऱ्यात स्थानिक नागरिकांना सोबत घ्यावे व त्यांच्या सूचनेनुसार हा दौरा पूर्ण करावा तेव्हाच खरी वस्तुस्थिती समोर येउ शकते असे शेवटी सचिन शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments