ट्रूकने प्रिमिअम आणि आकर्षक 'एफ१ इअरबड्स' लाँच केले इन्स्टण्ट पेअरिंग तंत्रज्ञान व समर्पित गेमिंग मोडने सक्षम ~


मुंबई, २६ मे २०२२ : ट्रूक या भारतातील उत्तम दर्जाचे वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, आवाजातील व्यावसायिकांसाठी तसेच संगीत चाहत्यांसाठी इअरफोन्स आणि बीस्पोक ऑकोस्टिक उपकरणे बनवणा-या झपाट्याने विकसित होत असलेल्या आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने आज १२९९ रूपये किंमतीमध्ये त्यांचे बहुप्रतिक्षित एफ१ इअरबड्स लाँच केले आहेत. काळा व निळा या रंगांमध्ये उपलब्ध एफ१ इअरबड्समध्ये सिरी व गुगल वॉईस असिस्टण्ट देखील आहे आणि आयपीएक्स ४ रेटिंगसह वॉटर-रेसिस्टण्ट आहेत.


एफ१ बड्स केससह ४८ तासांचा प्‍लेबॅक आणि एकाच चार्जमध्ये १० तासांपर्यंत प्लेबॅक देतात. एफ१ बड्समध्ये जवळपास ५५ एमएस लो लेटन्सीसह व्यावसायिक गेमर्ससाठी समर्पित गेमिंग मोड आहे. एफ१ बड्स ब्ल्यूटूथ ५.३ व इन्स्टण्ट पेअरिंग तंत्रज्ञानासह येतात, जे काही सेकंदांमध्येच इअरबड्सना ब्ल्यूटूथ सक्षम डिवाईसेसशी कनेक्ट करू शकते. तसेच एफ१ बड्समध्ये कॉल्सदरम्यान सुस्पष्टपणे आवाज ऐकू येण्यासाठी ड्युअल माइक एन्व्हायरोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन आहे. 


एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या एफ१ इअरबड्समध्ये कोबल केस डिझाइनसह हिडन डिजिटल बॅटरी डिस्प्ले आहे. तसेच या इअरबड्समध्ये इन्स्टण्ट पेअरिंग तंत्रज्ञानासोबत ग्रेटर स्टेबिलिटी व ब्ल्यूटूथ ५.३ सह जलद कनेक्शन आहे. ट्रू वायरलेस इन-इअर बड्समध्ये ड्युअल माइक एन्व्हायरोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी) देखील आहे.


 याव्यतिरिक्त इअरबड्समध्ये समर्पित गेमिंग मोडसह जवळपास ५५ एमएसपर्यंत अल्ट्रा-लो लेटन्सी आहे. हे इअरबड्स केससोबत जवळपास ४८ तासांचा प्लेटाइम आणि एकाच चार्जमध्ये १० तासांपर्यंत प्लेटाइम देतात. तसेच ट्रूकचे एफ१ इअरबड्स आरामदायीपणला पुनर्परिभाषित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या इअरबड्समध्ये ईजी अॅक्‍सेससह टॅप टू कंट्रोल आणि उच्‍च फिडेलिटी म्युझिकसह एएसी कोडेक आहे.


ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, "आम्हाला अल्पावधीतच भारतातील सर्वात उदयोन्‍मुख ब्रॅण्ड बनण्याचा खूप आनंद होत आहे. ट्रूकमध्ये आम्‍ही तंत्रज्ञान, कार्यक्षमता व युजर समाधानासंदर्भात आम्हा स्वत:लाच मागे टाकण्याच्या सातत्यपूर्ण ध्येयामधून प्रेरित आहोत. आणि यावेळी आम्ही ग्राहकांना अधिक आनंद देण्यासाठी एकाच उत्पादनामध्ये या त्रिसूत्रींचे कल्पकरित्या संयोजन केले आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन एफ१ इअरबड्स देशभरातील लाखो ग्राहकांमध्ये त्वरित लोकप्रिय ठरण्यासोबत या दिशेने अधिक नवोन्मेष्कारासाठी आदर्श स्थापित करतील."

Post a Comment

0 Comments