डोंबिवलीत इमारतीच्या पार्किंग जागेत सापडला मृतदेह

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली जवळील ठाकुर्ली जवळील जुन्या हनुमान मंदिराजवळील एका इमारतीच्या पार्किंग जागेत एका तरुणाचा मृतदेह सापडला. बुधवारी सकाळच्या सुमारास इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनात ही बाब आल्यावर त्यांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना माहिती दिली.दोन दिवसांपूर्वी हरविल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली होती.
   

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार,  डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील नेहरू रोड वरील विजयदास सोसायटीच्या ब्लॉक नंबर २१ मध्ये चेतन प्रदीप निकम हे राहत होते.दोन दिवसांपासून ते घरी न असल्याने रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी हरविल्याची नोंद केली होती.   बुधवारी सकाळी ठाकुर्ली चोळे येथील जुन्या हनुमान मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 


पोलिसांच्या तपासात हा मृतदेह चेतन प्रदीप निकम याचा असल्याचे सांगितले.  मृत्यूदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रथम पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र मृतदेहाच्या नातेवाईकांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करावे अशी मागणी केल्याने मृतदेह ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत असल्याचेही सांडभोर यांनी सांगितले.


चौकट

दोन दिवसांपूर्वी निकम यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्याचा रिपोर्ट पोलिसांकडे आहे.इमारतीच्या पार्किंग जागेत निकम हे आल्याचे दिसत असून परत इमारतीमधून बाहेर आले नसल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे.या कालावधीत सदर जागेत कोणीतही व्यक्ती आले नसल्याचेही सीसीटीव्ही कॅमेरात दिसत नाही. 
शवविच्छेदन अहवालनंतर निकम यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी पत्रकारांना सांगितले.

Post a Comment

0 Comments