
कल्याण : किल्ले पाहिलेला माणूस हा माहितीपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी डोंबिवलीकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी आठ वाजता मधुबन सिनेमा येथे "किल्ले पाहिलेला माणूस" गोपाळ निळकंठ दांडेकर हा स्फूर्तिदायी माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
याप्रसंगी गिर्यारोहण क्षेत्रात अनेक वर्षे यशस्वीपणे कार्यरत असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघचे सदस्य राहुल मेश्राम, छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर,गिर्यारोहक व गोनिदांच्या साथीने दुर्ग भ्रमण करणाऱ्या विद्या हुलस्वार, अनिल चव्हाण, दगडू बोडके हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. आयोजक माउंटेनिअर्स असोशिएशन डोंबिवली या संस्थेतर्फे, रोटरी क्लब डोंबिवली पश्र्चिम, टिळकनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि विरा थिएटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments