शेतकऱ्यांचे तीन वर्षांपासून रखडलेले ट्रान्सफार्मर तीन दिवसांत दिले मिळवून मनसेच्या दिनेश बेलकरे यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण : शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून बहुतांश गावे ही डोंगरातील दुर्गम भागात वसलेली आहेत. विकासा अभावी रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे पारंपरिक शेतीकुक्कुटपालनशेळी पालन आणि वनसंपदा ह्यावरच बहुतांश जनसंख्या अवलंबून आहे. त्यातच काही शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित पद्धतीने शेती व कुक्कुट पालन करू इच्छितात. पण त्यासाठी आवश्यक असलेले वीद्युत कनेक्शन आणि ट्रान्सफॉर्मर मिळवण्यासाठी त्यांना दोन ते तीन वर्षे महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवुनही दिलासा मिळत नाही. नुकतेच काही शेतकऱ्यांनी ही बाब मनसेच्या दिनेश बेलकरे ह्यांच्या निदर्शनास आणून दिली.


विविध योजनांतर्गत ट्रान्सफार्मर मंजूर होऊन देखील विद्युत अभियंते शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करीत होते. दिनेश बेलकरे ह्यांनी मनसे शैलीत शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर न देण्याबाबत जाब विचारताच अधिकार्यांची तारांबळ उडाली आणि तीन वर्षांपासून रखडलेले ट्रान्सफार्मर तीन दिवसांतच शेतकऱ्यांच्या शिवारात बसविण्यात आले.मनसे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असुनया पुढे शेतकऱ्यांना जर अशा पद्धतीने वेठीस धरले गेलेतर संबंधित महावितरण अभियंत्यांना मानसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असा सुचक इशारा दिनेश बेलकरे ह्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments