स्व. तुकाराम धर्मा माळींच्या ६ वी पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपणाचा संकल्प


डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी ओबीसे सेल कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मधुकर माळी यांनी वडील स्व. तुकाराम धर्मा माळींच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त  शुक्रवार १३ मे रोजी भोपर गावातील गावदेवी टेकडीवर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. भोपर गावातील राहत्या घरी मधुकर माली यांनी संकल्प करताना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनीहि या संकल्पात हातभार लावणार असल्याचे सांगितले. 


राष्ट्रवादी ओबीसे सेल कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मधुकर माळी,शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अॅड. ब्रम्हा माळी, जय हनुमान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष रमेश जयराम पाटील, शिवाजी माळी, सुधाकर माळी,पांडुरंग पाटील, सचिन पाटील, मनोज पाटील, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी मधुकर माळी म्हणाले, कोरोनाच्या काळात साधेपणाने वडिल्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राहत्या घरी हजारो नागरिकांना अन्नदान केले होते. यावर्षी वडिलांची आठवण म्हणून जागरूक देवस्थान असलेल्या गावदेवी टेकडीवर आपले कुटुंब व निसर्गाचे संवर्धन करून पर्यटन स्थळ देण्याचे प्रयतन करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments