कृतज्ञता दिन पाळून राष्ट्रवादीच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

ठाणे ( प्रतिनिधी)  गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डाॅ.जितेंद्र आव्हाडसाहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस तथा मा. नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकराजा राजर्षी शाहूमहाराज यांना स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञता दिन पाळून  अभिवादन करण्यात आले.


दि. ६ मे, १९२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले. यावर्षी या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या अनुषंगानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घंटाळी येथील ठामपा शाळा क्रमांक 19 येथे शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच, शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज  आदरांजली अर्पण केली.


यावेळी, "छत्रपती शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील योगदान हे अमूल्य आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येकाच्या मनात समता, बंधुता रुजवत खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ते रयतेचे राजे होते. देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख हा प्रामुख्याने होतो. 


केवळ २८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळावा म्हणून आपल्या दुरदृष्टीने कार्य करून समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाने पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही 100 सेकंद स्तब्ध राहून "कृतज्ञता दिन" पाळला", असे आनंद परांजपे यांनी सांगितले. 


दरम्यान,  शनिवार, दि. ७ मे, २०२२ रोजी " एक तास राष्ट्रवादीसाठी "  या महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या पक्षाच्या उपक्रमामध्ये “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज " यांच्या कार्यावर ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा- माजीवडा आणि कळवा-मुंब्रा या चारही मतदारसंघात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 


यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, ठामपा परिवहन सदस्य नितीन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे , विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, फ्रंटल /सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, हुसेन मनियार, विनोद उत्तेकर, राजू चापले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय भामरे, नारायण उत्तेकर,  रविंद्र पालव,  संतोष सहस्रबुद्धे, शिवा कालुसिंग, भगवान केणी, संजीव दत्ता, संतोष मोटे, रत्नेश दुबे, समीर पेंढारे, तुळशीराम म्हात्रे, कौस्तुभ धुमाळ, साई प्रभू, विवेक गोडबोले, सुमीत गुप्ता, महिला प्रदेश पदाधिकारी शशिकला पुजारी युवक पदाधिकारी संतोष मोरे, कुणाल भोईर, संदीप पवार यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments