मुंबई - नाशिक महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; अपघातात ट्रकचा चक्काचूर


भिवंडी दी 31(प्रतिनिधी ) : मुंबई नाशिक  महामार्गावरील पिंपळास फाटा येथे कारला वाचविण्याच्या नादात ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रकचा चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रक पलटी होण्या आदीच चालक व वाहक ने ट्रकमधून उड्या मारल्याने बचावले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 


अपघातग्रस्त ट्रक आज सकाळच्या सुमारास नवीमुंबई तुर्भे येथून डिस्टिक वॉटरचे ड्रम घेऊन भिवंडीतील एका गोदामात निघाला होता. त्याच सुमाराला ट्रक  मुंबई - नाशिक  महामार्गावरील पिंपळास फाटा येथे आला असता एका मारुती कारला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ड्रमने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. विशेष म्हणजे ट्रक पलटी होण्यापूर्वीच चालक व वाहकने ट्रकमधून उद्या मारल्याने बचावले आहे.


 मात्र या  भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.  भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांचे पथक व अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. 

Post a Comment

0 Comments