पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आर.आर. ( आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण

■जिल्हातील उसाटणे, मोरणी, उशिद-आरोळे, सिंगापूर, बाभळे  गावांना पुरस्कार

ठाणे दि.  १ मे ( जि.प): ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर.आर. ( आबा ) पाटील तालुका आणि जिल्हास्तरावरील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे च्या मुख्य शासकीय कार्यक्रमात करण्यात आले. जिल्हातील  उसाटणे, मोरणी, उशिद-आरोळे, सिंगापूर, बाभळे  गावांना तालुका स्तरीय पुरस्कार  तर , सिंगापूर, या गावाला जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे,  ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रकांत पवार, सहायक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके उपस्थित होते. 


जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत आर.आर. ( आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते.  रविवारी सन २०२०-२१ चे पुरस्कार वितरण करण्यात आले. अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, भिवंडी तालुक्यातील मोरणी, कल्याण तालुक्यातील उशिद आरेळे, मुरबाड तालुक्यातील सिंगापूर, शहापूर तालुक्यातील बाभळे आदी गावांना तालुकास्तरीय १० लाखाचा पुरस्कार तर मुरबाड तालुक्यातील सिंगापूर गावाला जिल्हास्तरीय ५० लाखाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments