मुंब्य्रात ईद मेहंदी फेस्टिव्हल ५२३ महिलांनी घेतला सहभाग


ठाणे (प्रतिनिधी)  - रमजान ईद म्हणजे तमाम मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण! हा सण साजरा करताना अनेक महिला आपल्या हातांना  मेहंदीने रंग चढवित असतात.  यासाठीच मंगळवारी येणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मा. विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्य्रात मर्झिया पठाण यांनी मेहंदी फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. 


ईदच्या पार्श्वभूमीवर डायमंड हाॅलमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये विविध ठिकाणचे मेहंदी आर्टिस्ट सहभागी झाले होते. या आर्टिस्टने तसेच स्थानिक महिलांनी मेहंदीच्या नक्षीकामांचे प्रास्ताविक दाखविले. या फेस्टिव्हलमध्ये सुमारे ५२३ महिलांनी आपल्या हातावर मेहंदी काढून घेतली. अशा प्रकारचा फेस्टिव्हल सबंध ठाणे जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला होता. 


शनिवारी सायंकाळी सुरू झालेला हा मेहंदी फेस्टिव्हल सुमारे पाच तास सुरू होता. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी महिलांना मोफत मेहंदीचे कोनचे वाटपही मर्झिया शानू पठाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments