महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा. वर्धापन दिन पालिकेत साजरा, महापौर, आयुक्त यांनी दिल्या कामगार दिनाच्या शुभेच्छा


भिवंडी, प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालिका मुख्यालय आवारात महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. 


यावेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, सभागृह नेता सुमित पाटील, प्रभाग समिती 2 चे सभापती प्रशांत लाड, नगरसेवक संतोष शेट्टी, सिध्देश्वर कामुर्ती, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहायक आयुक्त प्रणाली घोंगे, नितीन पाटील, सर्व प्रभाग अधिकारी दिलीप खाने, फैजल तातली,  बाळाराम जाधव, सुनील भोईर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, आरोग्य विभाग प्रमुख जे. एम.सोनावणे, वैद्यकीय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. बुशरा सय्यद, अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील, व आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजरोहण मुख्य कार्यक्रमानंतर पालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर व आयुक्त यांनी पुष्पहार अर्पण केला. या नंतर जुने मुख्यालय समोरील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास , तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर व आयुक्त यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


प्रभाग समिती 1 व 2 यांच्या कार्यालयात सभापती प्रशांत अशोक लाड यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला.शहरातील सर्व राष्ट्रीय पुरुष, यांच्या पुतळ्यास पुष्पहार तर, हुतात्मा स्मारक येथे पुष्प जाळ्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments