वेलॉक्स शोरुमचे दिमाखदार उद्घाटन एका वर्षात मुंबई विभागात 55 हजार मारुती - सुझुकीच्या गाड्यांची विक्री

 

■इंधन दरवाढीचा वेग वाहन उद्योगांसाठी नकारात्मकच - शशांक श्रीवास्तव


ठाणे (प्रतिनिधी)- सामान्यांची कार म्हणून ओळख असलेल्या मारुती-सुझुकी गाड्यांच्या विक्रीचा दर दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. गेल्या एका वर्षात मुंबई-ठाणे विभागामध्ये सुमारे सव्वा लाख गाड्यांची विक्री झाली आहे. त्यामध्ये मारुती-सुझुकीच्या 55 हजार गाड्यांचा समावेश आहे. त्यावरुन मारुती उद्योग समुहाला नागरिकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचेच स्पष्ट होत आहे,  असे मारुती-सुझुकीचे वरिष्ठ संचालक शशांक श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


मारुती-सुझुकीच्या ‘वेलॉक्स’ या वागळे इस्टेट येथील नवीन शो रुमचे उद्घाटन  मारुती-सुझुकीचे वरिष्ठ संचालक शशांक श्रीवास्तव, नोबुताका सुझुकी यांच्या हस्ते तसेच गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड, ॠता आव्हाड, दिग्वीजय गर्जे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. त्यावेळी श्रीवास्तव बोलत होते.   

 

मारुती-सुझुकी ही केवळ गाड्यांची विक्रीच करीत नाही. तर, ग्राहकांचे समाधान करण्यावर अधिक भर देत असते. त्यामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये मारुती-सुझुकीच्या गाड्यांच्या विक्रीचा दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या वर्षात मुंबई विभागामध्ये सुमारे 1 लाख 26 हजार गाड्यांची विक्री करण्यात आलेली आहे. त्यापैकी 55 हजार गाड्या या मारुती-सुझुकीच्या आहेत.  मारुती-सुझुकीवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास वृद्धीगंत व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे.


 इंधन दरवाढीचा वेग हा वाहन उद्योगासाठी नकारात्मक असतो, यामध्ये कोणाचेही दुमत असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे लोकांचा कल सीएनजी वाहने खरेदी करण्याकडे अधिक  आहे.   मारुती-सुझुकीकडून ईलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे का, याबाबत विचारले असता, ईलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीचा खर्च अधिक आहे. 


त्यामुळे सामान्य भारतीयांना परवडणारे तंत्रज्ञान विकसीत करुन त्याआधारे ई- वाहनांची निर्मिती करण्यावर विचार सुरु आहे; तसेच त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत,  असे सांगितले.  वाहनांच्या हस्तांतरणाचा वेग कमी आहे, याबाबत ते म्हणाले की, तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या केवळ भारतामध्येच नाही तर सबंध जगभर आहे. ही समस्याही लवकरच मार्गी लागणार आहेत.  


चौकट

मारुती-सुझुकी ही सामान्यांची कार कंपनी- ना. डॉ. जितेंद्र आव्हाड 

जेव्हा भारतामध्ये वाहन उद्योगाला चालना मिळाली. तेव्हापासून मारुती कार ही सामान्यांची कार म्हणून ओळखली जात आहे. चारचाकी गाडी घेण्याचे सामान्यांचे स्वप्न मारुती-सुझुकीनेच पूर्ण केले आहे. मारुतीवर सामान्य भारतीयांचा प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास कसा वृद्धीगंत होईल, याकडे मारुती-सुझुकी उद्योग समुहाने लक्ष दिले पाहिजे. ही कार सामान्यांना अधिकाधिक कशी प्रिय होईल, याचाही विचार केला पाहिजे, असे यावेळी गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments