देसलेपाड्यात 5000 ली. क्षमतेच्या दोन टाक्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा

 


 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली मधील देसले पाड्यातील एका कुटुंबातील पाच व्यक्तींचा काही दिवसांपूर्वी संदप येथील खदानीच्या  पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सदर ठिकाणाची पाहणी केली.  कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सदर ठिकाणची  पाहणी केली. 


पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गायकवाडवाडी देसले पाडा या ग्रामीण भागात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार त्वरित 5000 ली. क्षमतेच्या  पाण्याच्या टाक्या बसविण्याची व्यवस्था केली केल्याने सदर परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय  उपलब्ध झाली आहे.

Post a Comment

0 Comments