भागशाळा मैदानातील ` जल्लोष 2022`ला डोंबिवलीकरांचा उत्फूर्त प्रतिसाद


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना दोन वर्षांनंतर घराबाहेर पडलेल्या बच्चेकंपनीसाठी डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे भव्य आगरी मालवणी जत्रोत्सव`जल्लोष 2022` सुरु करण्यात आला आहे.यात डोंबिवलीकरांचा उत्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसते. डोंबिबली शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश तेलगोटे आणि केतकी पोवार यांच्या माध्य मातून `जल्लोष 2022` महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवाचे उदघाटन  शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे आणि कल्याण जिल्हा युवा सचिव राहुल म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी `सकस शिदोरी` ( महिला गुह उद्योग) स्टॉलला भेट दिली.या महोत्सवात सुमारे 50 ते 60 दुकानांचे स्टॉल उभारण्यात आले असून बच्चेकंपनीसाठी उंच आकाशपाळणे तर खवयांसाठी विविध खाद्य व ब्रॅण्डेड आईस्क्रीमचे स्टॉल असून मालवणी कोंबडीवडे खास आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे महिलावर्गास पसंतीस पडणारे घरगुती रुचकर पदार्थांचे स्टॉलवर महिलांची गर्दी होत आहे. तर कोकणचा राजा "रत्नागिरी हापूस आंब्याचे स्टॉल आणि सौंदर्यप्रसाधनांच्या स्टॉलवर महिला गर्दी करीत आहेत. भागशाळा मैदान हे पश्चिम डोंबिवलीकरांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी डोंबिवलीकराना सोयीचे होत आहे. दहा दिवस हा महोत्सव असून महिलामुले यांच्यासह जेष्ठ नागरिक याचा नक्कीच आनंद घेतील असे मत आयोजक प्रकाश तेलगोटे यांनी व्यक्त केले. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतल्याचे तेलगोटे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments