ठाणे : प्रतिनिधी : 2021 मेडिकीन मिसेस महाराष्ट्र या स्पर्धेत अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, सर्व समाजातील सर्व महिला डॉक्टर्स, होमिओपॅथी, फिजिओथेरपी असे संपूर्ण महाराष्ट्रातून 220 स्पर्धक आले होते, यातून 56 फायनलिस्ट निवडले गेले. एम डी, होमिओपॅथी डॉ. अश्विनी बैरागी यांची मुंबई, ठाणे येथून अंतिम फेरीत निवड झाली होती. डिसेंबर 2021 मेडिकीन मिसेस महाराष्ट्र हा कार्यक्रम पुण्यात 6 एप्रिल 2022 रोजी 3 दिवस आयोजित केला होता. पहिला दिवस ग्रोमिंग आणि फोटोशूट, प्रशिक्षण पूर्ण झाले.
दुसऱ्या दिवशी टॅलेंट राऊंड मध्ये डॉ अश्विनी बैरागी यांनी अॅसिड हल्ला नृत्य थीम, परिचय फेरी, रॅम्पवॉक राऊंड सादर केला यामुळे त्या बोल्ड एन ब्युटीफुल महाराष्ट्र २०२२ च्या विजेत्या ठरल्या.
डॉ. बैरागी यांना अडथळ्यांवर नव्हे तर ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला आवडते, प्रत्येक महिलांनी स्वत:साठी वेळ काढला पाहिजे आणि आंतरिक सौंदर्याने स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. अश्विनी बैरागी या जीवनात दयाळू मेहनती आणि आशावादी आहेत.
यशाचे श्रेय ती तिच्या पती आणि पालकांना देते, तिची आई तिच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानची सदस्य असल्याने ती आरोग्य शिबिरासह समाजसेवाही करते, प्रतिष्ठांनचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू लोकांना डॉ. बैरागी या मदत करतात.
बोल्ड अँड ब्यूटीफुल २०२२ जिंकल्याबद्दल त्यांनी मेडिकीन मिसेस महाराष्ट्र ऑर्गनायझर डॉ. प्रेरणा बेरी काळेकर, डॉ. प्राजक्ता शहा (सचिव), योगेश पवार सर, मेडिकीन टीमचे डॉ.आश्विनी बैरागी यांनी धन्यवाद मानले आहेत.
0 Comments