संदीप जोयशी यास पुरुषांच्या 1500 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण


कल्याण : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष आणि महिला अथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. यात विविध जिल्ह्यातून एक हजार  पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.  


यामध्ये 1500  मीटर रनिंग या भागामध्ये 3 मिनिट 51 सेकंद वेळ देत एस एस टी महाविद्यालय येथील संदीप जोयशी याने सुवर्ण पदक  पटकावले आणि चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. 


एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी , उपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानी , उपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल , पुष्कर पवार महाविद्यालयाचे  मार्गदर्शक संदेश चव्हाण आणि अविनाश पवार  यां सर्वांनी संदीप चे  अभिनंदन केले आणि चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments