भिवंडी महानगर पालिके तर्फे 15 दिव्यांगांना केबिनचे वाटप, दिवय्यांगानी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.. महापौर प्रतिभा विलास पाटील


भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग असलेल्या व्यक्तींकरता पालिकेच्या मार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात.याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना समाजात काहीतरी स्वयं रोजगार मिळणे आवश्यक आहे,  असे उद्गार महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढले.


पालिकेच्या वतीने   दीव्यांग  व्यक्ती यांना कॅबिन वाटपाचा कार्यक्रम पालिका भांडार गृहात झाला, त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याण विभाग उपायुक्त नूतन खाडे, सहायक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी, समाजसेवक युवा नेते मयुरेश पाटील उपस्थित होते.


महापौर प्रतिभा पाटील पुढे म्हणाल्या की, दिव्यांग व्यक्ती या समाजाचा एक घटक आहेत त्यांना आपण वेगळे आहोत असे कोठेही वाटू नये, दिव्यांग व्यक्ती यांनादेखील कुटुंब आहे व ते कुटुंब चालविणे करिता काहीतरी स्वयं रोजगार मिळणे आवश्यक आहे, रोजगार मिळाल्यावर त्यांना एक आत्मसन्मान त्यांना मिळेल असे देखील महापौर यांनी नमूद केले.


यावेळी उपायुक्त नूतन खाडे यांनी सांगितले की दिव्यांगाना यांना कॅबीन देणे ही मुळ कल्पना माजी आयुक्त डॉ पंकज आशिया यांची होती त्याला प्रत्यक्षात चालना सुधाकर देशमुख यांच्या काळात मिळाली, आज आपण हा कार्यक्रम करीत आहोत. या लाभार्थी यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली .

Post a Comment

0 Comments