राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त 100 सेकंद स्तब्ध उभे राहून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले कृतज्ञता पूर्वक विनम्र अभिवादन

■राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे कोल्हापुरात तीन दिवसीय समारोह

मुंबई दि.6 - लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज  यांच्या 100 व्या  स्मृतीदिनी स्मृतीशताब्दीनिमित्त आज सकाळी 10 वाजता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षी शाहू महाराजांना विनम्र कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. 


छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या  स्मृतीशताब्दी निमित्त दि.6 मे रोजी  सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कोल्हापुरात  कृतज्ञ विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन कोल्हापूरात करण्यात आले होते.मात्र लोकराज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनी केवळ कोल्हापूरात नाही तर देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे असे सांगत आज सकाळी 10 वाजता केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहत राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले.


राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षा निमित्त भव्य कृतज्ञता समारोह तीन दिवसांचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षातर्फे कोल्हापुरात लवकरच आयोजित करण्यात येणार असून त्यात परिसंवाद;मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


राजर्षी शाहू महाराजांचे परिवर्तनाच्या समतेच्या चळवळीत मोठे योगदान असून शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक युगप्रवर्तक महापुरुष होते. त्यांनी माणगाव येथील परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे उद्गारकर्ते पुढारी होतील असे सांगितले होते.कोल्हापुरात मागासवर्गीयांना  आरक्षण  लागू करून आरक्षणाचे जनक ठरलेले राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत असे ना.रामदास आठवले म्हणाले.


पुणे व्हीआयपी शासकीय अतिथी गृह येथे आज सकाळी नाश्ता करत असताना 10 वाजले कळताच नाश्ता सोडून ना.रामदास आठवले यांनी सर्वांना स्तब्ध उभे राहण्यास सांगून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीदिना निमित्त 100 सेकंद उभे राहून विनम्र अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पर्वा आज ना.रामदास आठवले यांनी पुण्यात साजरे केले.        

Post a Comment

0 Comments