डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बनावट नोटा बनवणारी टोळी, मोबाईलची जबरी चोरी, दुचाकी चोरी, घरफोडी करणाऱ्या, तसेच ईराणी टोळीतील सराईत गुन्हेगार अशा 10 जणांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आणले असून तब्बल 4 लाख 220 रूपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये सराईत गुन्हेगारांचा सुळसुळाट रोखण्यासाठी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि प्रदीप पाटील, सपोनि दिपक सरोदे, सपोनि देविदास ढोले यांच्यासह विजय भालेराव, संदिप भालेराव, शशिकांत निकाळे, मनोहर चित्ते, संदिप भोईर, नवनाथ कांगरे, जितेंद्र चौधरी, काशिनाथ जाधव, सचिन भालेराव, सुचित ठिकेकर, सुचित मघाले, रविंद्र हासे, महेंद्र बरफ, दिपक भावसार, दत्तात्रय मोरे, भगवान भोईर या पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन 10 बदमाश्यांना कोठडीचा रस्ता दाखवला.
या पथकाने एसटीस्टँडवर भारतीय बनावटीच्या 14 हजार 500 हजारांच्या बनावट नोटा वटविण्यासाठीआलेल्या रजनिशकुमार श्रीदुलारचंद चौधरी (19), हर्षद नौशाद खान (19) आणि अर्जुन राधेशाम कुशवाह (19) या तिघांना बेड्या ठोकल्या. त्यानं केलेल्या तपासादरम्यान बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे कलर प्रिन्टर, रंगाच्या कलरच्या डब्या, बाटल्या, रेडीयम टेप/पेपर, कटर, ब्लेड बॉक्स, लिक्वीड डब्बे, वॉटरमार्क पेपर त्यावर महात्मा गांधीजींचा फोटो, कागदाच्या रिम असा 94 हजार 550 रूपये किंमतीची सामुग्री हस्तगत केली.
चिकणघर परिसरातील 66 वर्षीय वृद्धेचा गळ्यातील 2 चेन हिसकावून पसार झालेल्या मेहंदीहसन उर्फ इन्न अक्रमअली सैय्यद इराणी हुसेन (32, रा. रशिद कंपाऊंड, कौसा-मुंब्रा) याला मुंब्र्यात घुसून या पथकाने थरारक पाठलाग करत बेड्या ठोकल्या. या इराण्याकडून आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून दाखल असलेल्या 8 पैकी 6 गुन्हे उघडकीस आणले असून 1 लाख 3 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या संजय चौहान यांना लुटून पसार झालेल्या जुनेद हबीब शेख (36), खालीक इस्काईल अन्सारी (48), दयानंद गणेश नसरगंध (33) आणि सलमान जैनुद्दीन अंतुले (27) या चारही बदमाश्यांच्या मुसक्या आवळल्या. या चौकडीकडून संजय चौहान यांचे लुटलेले 18 हजार 100 रूपये, शिवाय 6 मोबाईलसह 1 लाख 46 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
किशोर रूद्राक्ष यांची स्कायवॉकजवळ पार्क केलेली दुचाकी बेपत्ता झाली होती. ही दुचाकी चोरणाऱ्या अब्दुल रहिम महमद शमीम (19) याला भिवंडीतून उचलले. त्याच्याकडून 2 दुचाक्या हस्तगत करून चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले. शंभू गुप्ता या रामबागमधील पारसनाथ किराणा स्टोअर्स नावाचे दुकान चालविणाऱ्या दुकानदाराचे घर फोडून चोरी करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा सखोल तपास करून अवघ्या 4 तासांमध्ये सराईत चोरटा दिनेश संजय पेडाणकर (20) या अंबरनाथ पश्चिमेकडे राहणाऱ्या चोरट्याला चोरलेल्या रोकडसह अटक केली. घरफोड्या-चोऱ्या करणारे त्याचे अजूनही दोन साथीदार असून पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.
0 Comments