ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस च्या वतीने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिना निमित्त रोजगार मेळावा संपन्न


ठाणे , प्रतिनिधी : एकीकडे बेरोजगारीमुळे  तरूणाईच्या नैराश्याच्या फायदा घेऊन धर्मांध शक्ती आपल्या देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न होत असताना तरूणांना योग्य मार्ग दाखवून त्यांना रोजगार देण्याचे काम काँग्रेसच्या सचिन शिंदे यांच्या माध्यमातून आज कामगारदिनी होत असून अशा प्रकारचे कार्य सर्वच स्तरातून झाले पाहिजेत असे मत महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

             

ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस च्या वतीने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनद परांजपे,ठाणे महानगरपालीका मा.उपमहापौर सौ.पल्लवी कदम,प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप,जे.बी.यादव,राजेश जाधव,ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,स्वप्नील कोळी,अॅड हिदायत मुकादम,अफजल तलवलकर,अमोल गांगुर्डे,सुमित गुप्ता,दिनेश मेहरोल,संदिप ढकोलिया शहर काँग्रेसचे प्रकाश मांडवकर,नाना कदम,वसत जगदाळे,शिरीष घरत,युवक अध्यक्ष आशिष गिरी,लोकेश घोलप,सुमित गुप्ता मान्यवर उपस्थित होते .


याप्रसंगी बोलताना ना.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, बेरोजगारी वाढते आहे हे सत्य आहे आणि त्यांना. रोजगार मिळवून देणे हे काम देवदूतापेक्षा कमी नसून ठाण्यात इंटकच्या माध्यमातून सचिन शिंदे यांनी केलेले काम हे अनमोल असून अशा कामांना माझा नेहमीच त्यांना पाठीबा राहील असे गौरवोद्गार काढले.

       

 या रोजगार मेळाव्याचा 860 युवकांनी लाभ घेतला या रोजगार मेळाव्यात जवळपास 18 विविध कंपनीचे एक्झिक्युटिव्ह सहभागी झाल्या होत्या या मध्ये प्रामुख्याने सेल्स एक्झिक्युटिव्ह,कस्टमर केअर,अकाउंट,टेली काॅलर,टिम लिडर,युनिट मॅनेजर,डेप्युटी मॅनेजर,एच.आर.मॅनेजर,ट्रेनर्स,ब्रांच मॅनेजर,फायनान्स एक्झिक्युटिव्ह,व्हेरिएबल एजन्सी मॅनेजर,बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आदि पोस्ट बाबत मार्गदर्शन मिळणार असून एक्सिस सिक्युरिटीज बॅकीग,होम इंडीया प्रायव्हेट लिमिटेड,रिलायन्स जनरल इन्शुरन्स,कनेक्शन डायरेक्ट,चोलामंगलम,अॅक्सेचर,आय.सी.आय.सी.आय्.सिक्युरिटीज,एडलवाईस लाईफ इन्शुरन्स,नेमिनाथ मोटर्स आदि कंपनीचे एक्झिक्युटिव्ह उपस्थित राहीले होते.

Post a Comment

0 Comments