कल्याण : ११ वर्षांखालील रोलबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा अहमदाबादमध्ये पार पडली. या स्पर्धेत कल्याण मधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र संघ मुले व मुली दोघांनी सुवर्णपदक तर आरएसएसए पुणे संघाने कांस्य पदक जिंकले. केएसएफ अकादमीचे विद्यार्थी महाराष्ट्र संघाकडून कल्याण मधील दिया सिंग (पोदार स्कूल), अनिका अय्यर (बिर्ला स्कूल), आर्या बुरकुले (श्री वाणी विद्याशाळा), ऋषी केरेलिया (सेक्रेड हार्ट स्कूल) आरएसएसए पुणे संघासाठी खेळले. विराज गाडगे (डॉन बॉस्को स्कूल) यांचा संघासाठी सहभाग होता.
खेळाडूंच्या या यशाबद्दल माजी नगरसेवक संजय पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी संघाच्या प्रशिक्षक अबर्णा सेतूरामन, ठाणे जिल्हा रोलबॉल असोसिएशनचे सचिव प्रताप पगार यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले.
0 Comments