माझ्या नसानसातून वाहते मानवीयता या भावनेतून ६६० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान


कल्याण : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादांनी माझ्या नसानसातून वाहते मानवीयता’ या भावनेतून गोरेगांवमध्ये ६६० निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने  रविवारी संत निरंकारी सत्संग भवनसंतोष नगरगोरेगांव येथे या रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


      या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने ३०९ यूनिट रक्त संकलित केलेलोकमान्य टिळम मेमोरियल रुग्णालयसायन यांच्या रक्तपेढीने २४२ युनिट रक्त संकलित केले तर कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढीने १०९ यूनिट रक्त एकत्रित केले . रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक नगरसेवक सुहास वाडकर आणि तुलसी शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.  खासदार कीर्तिकर यांनी संत निरंकारी मिशनची समाजाच्या प्रति निष्काम सेवा आणि मानवतेच्या महान कार्याची प्रशंसा केली.


      संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक शंभूनाथ तिवारी यांनी स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. 

Post a Comment

0 Comments