मराठी शाळांना चांगले दिवस येण्यासाठी भव्य खेळणी प्रदर्शन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (दत्तनगर) शाळेचा उपक्रम

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली- राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने  तीन दिवशीय भव्य खेळणी प्रदर्शन आयोजित केले होते.

 
सर्वांगीण विकास करणे हा होय. सुसंस्कारीत समाज निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून शिशु शिक्षणाचा संस्कार बालवयातच बालकाच्या मनावर करून उद्याचा नागरिक घडविणासाठी व समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी 'खेळण्यांचे प्रदर्शन' हे पहिले पाऊल असल्याचे पूर्व प्राथमिक शाळाप्रमुख कीर्ती मुरादे यांनी केले.


अश्या प्रकारे आयोजित केलेल्या उपक्रमांमुळे पुन्हा एकदा मराठी शाळांच्या कडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल त्यामुळे मराठी शाळा पुनःरुज्जीवीत होऊन मराठी शाळांना चांगले दिवस येतील. सर्व थरांतून या खेळणी प्रदर्शनाचे खूप कौतुक करण्यात आले.


 शिशुवाटिकेतील मुलांच्या मानसिक, भावनिक, व सामाजिक तसेच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये विकासाच्या दृष्टीने १२ व्यवस्थांचा इथे विचार करून त्या अंतर्गत येणारे क्रियाकलापावर आधारित वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश केलेला आहे.कार्यशाळा, विज्ञानकक्ष , कलाशाळा, प्राणी संग्रहालय , रंगमंच , बागकाम, प्रदर्शनी, तरण तलाव, क्रिडांगण, घर व्यवस्था, वस्तू संग्रहालय , चित्रापुस्तकालय सादर करण्यात आले होते.
   

 प्रदर्शनासाठी शाळेच्या विष्णुनगर, अरुणोदय, दत्तनगर, रामनगर, गणेशपथ, रामचंद्रनगर या सहा शाळांचा सहभाग होता.पूर्व प्राथमिक शाळाप्रमुख कीर्ती मुरादे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक वर्गाच्या वतीने आयोजित खेळणी घर प्रदर्शनाला पालकांचा तसेच डोंबिवलीतील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आणि परिसरातील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी बदलापूर, कल्याण, येथील शाळेचे शिक्षक ही आले होते.मुलांनी प्रदर्शनाचा आनंद लुटला. विविध वस्तू पाहून मुले आनंदित झाली. हसत खेळत शिक्षण कसे शिकावे हे पालकांना समजले.


     शाळेने चांगला उपक्रम राबविला आहे. त्यातून मुलांना आपली संस्कृती, ग्रामीण व शहरी जीवन समजण्यास मदत झाली. असेच प्रदर्शन व कार्यक्रम शाळेतून राबविण्यात यावे हा उपक्रम शाळेने चालू केल्याबद्दल शाळेचे आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन. अश्या प्रकारे पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments